S M L

उत्तराखंडच्या जंगलात वनवा पेटला, 6 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: May 1, 2016 12:07 PM IST

उत्तराखंडच्या जंगलात वनवा पेटला, 6 जणांचा मृत्यू

 01 मे : उत्तराखंडमधल्या जंगलांमध्ये गेल्या 88 दिवसांपासून वणवा पेटलेला आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मात्र, त्याला अजूनही यश मिळत नाहीये. या आगीमुळे तब्बल 3 हजार एकरांवरचं जंगल नष्ट झालंय. तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

ही आग विझवण्यासाठी एनडीआरएफच्या तीन टीम पाठवण्यात आल्या आहेत. एकूण 6 हजार कर्मचारी आग विझवण्याच्या कामाला लागले आहेत. बचावकार्यात हवाई दलही सहभागी झाले आहे. उत्तराखंडमधल्या श्रीनगरमध्ये वायू दलाचे 11 अधिकारी, ज्यांच्यात पायलटस्‌चाही समावेश आहेत. त्यांनी वणव्याचा अंदाज घेण्यासाठी हवाई पाहणी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2016 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close