S M L

'हे' आहेत मुंबईचे शेतकरी

मुंबईत शेतकरी कसे असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण आयबीएन लोकमतनं याचा शोध घेतलाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 4, 2017 09:20 AM IST

'हे' आहेत मुंबईचे शेतकरी

मुंबई,04 सप्टेंबर: मुंबईतून सोळा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी अर्ज आले आहेत. मुंबईत शेतकरी कसे असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण आयबीएन लोकमतने याचा शोध घेतलाय.

मुंबईतून कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जांचा सगळा गोंधळ 'आधार कार्ड'मुळे झालाय.अर्जदार मुंबईत राहतात. त्यांची जमीन गावी आहे. त्या जमिनीवर त्यांनी स्थानिक जिल्हा बँकेतून कर्जही घेतली आहेत. त्यांनी कर्जमाफीसाठी जो अर्ज केलाय त्यावर मुंबईतून काढलेल्या आधार कार्डचा पत्ता आहे. या आधार कार्डवरील पत्त्यामुळे सरकारच्या वेबसाईटवर शेतकरी मुंबईचा असल्याचं दिसतंय म्हणून त्यात हे मुंबईचे शेतकरी वाटत आहेत. ही अवस्था अनेक अर्जदारांची असल्याचं सांगण्यात येतंय.

आता आधार कार्डच्या माहितीमुळे मुंबईत राहणाऱ्या या गावोगावच्या शेतकऱ्यांची कुंडलीही अनायसे  सरकारच्या हातात आली आहे. आधारचा पत्ता मुंबईचा असलेले राज्यातले अनेक शेतकरी मुंबईच्या यादीत आले आहेत. पण ज्यांनी खरंच कर्जमाफी लाटण्याचा प्रयत्न केलाय ते किती आहेत हे शोधण्यासाठी सरकारी यंत्रणा आत कामाला लागली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close