S M L

पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार

पैसे देण्याच्या बहाण्याने मित्राच्या बायकोला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कल्याणजवळच्या द्वारली गावात घडलीये.

Sachin Salve | Updated On: Apr 29, 2017 05:38 PM IST

पैसे देण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून सामूहिक बलात्कार

29 एप्रिल : पैसे देण्याच्या बहाण्याने मित्राच्या बायकोला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना कल्याणजवळच्या द्वारली गावात घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीये.

धक्कदायक बाब म्हणजे बलात्कार करणारे दोन्ही आरोपी मुंबईच्या बेस्ट बसचे चालक असून उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. सुनील मोरे आणि अरविंद कुंभार अशी आरोपींची नावं आहेत.

सुनील यानं त्याच्या मित्राच्या बायकोला पैसे घेण्यासाठी घरी बोलावलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचं चित्रिकरण अरविंद यानं केलं त्यानंतर पीडित महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close