S M L

...आता काय ट्रम्प बंदूक घेऊन येणार आहे का ?-उद्धव ठाकरे

गोरक्षकांनी आता अमरनाथला जावं आणि अतिरेक्यांचा मुकाबला करावा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2017 09:06 AM IST

...आता काय ट्रम्प बंदूक घेऊन येणार आहे का ?-उद्धव ठाकरे

11 जुलै : देशात हिंदूत्ववादी सरकार असताना अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला झाला. आता तिथं काय ट्रम्प बंदूक घेऊन येणार आहेत असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.

मुंबईत गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केला. उत्सवांवर बंधनं घातली तर बंधनं मोडून काढू, उत्सवावर बंधनं घालू नये अशी खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी  असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.

गोरक्षकांनी आता अमरनाथला जावं आणि अतिरेक्यांचा मुकाबला करावा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

नियमांचा अतिरेक करून उत्सवावर बंधनं नको अशी बंधनं घातली तर सहन करणार नाही मंडळांनीही उत्सवाचा अतिरेक करू नका अशा कानपिचक्याही उद्धव ठाकरेंनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2017 11:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close