S M L

आता आपल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा -उद्धव ठाकरे

घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमले नाही हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आता तुम्ही घोषणा करणार की नाही ?

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2017 12:03 AM IST

आता आपल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा -उद्धव ठाकरे

04 एप्रिल : घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमले नाही हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिले आता तुम्ही घोषणा करणार की नाही ?, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं उद्धव ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करून अभिनंदन केलं.  कर्जमाफीचा निर्णय धाडसाने घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असं सांगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या शेतकऱ्यांच्याही कर्जमाफीची घोषणा त्वरित करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

तसंच घोषणा म्हणजे फक्त निवडणूक जुमले नाही हे योगी आदित्यनाथ यांनी दाखवून दिलंय. जे उत्तर प्रदेशसारख्या राज्यात घडलंय. मग कृषिप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे का राहावे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आत्महत्या नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारीपणामुळेही होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा हीच आमची मागणी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 12:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close