S M L

मुंबईत वाळकेश्वर भागातील लिजेंड इमारतीत लागलेली आग आटोक्यात

32 मजली इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग लागली होती.

Sachin Salve | Updated On: Dec 25, 2017 06:05 PM IST

मुंबईत वाळकेश्वर भागातील लिजेंड इमारतीत लागलेली आग आटोक्यात

25 डिसेंबर : मुंबईतील वाळकेश्वर भागातील लिजेंड इमारतीमधील फ्लॅटला भीषण आग लागली होती. आताही आग आटोक्यात आलीये. 32 मजली इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग लागली होती. सुदैवाने वेळीच इमारत खाली करण्यात आल्यामुळे जीवीतहानी टळली.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास लिजेंड या 32 मजली इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी 8 फायर इंजिन आणि 8 वॉटर टँकर्स पोहोचले असून आग विझवण्याचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. अखेर दोन तासांच्या आग आटोक्यात आलीये.

उच्चभ्रु अशा या वाळकेश्वर भागातील लिजेंड इमारतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचेही फ्लॅट आहेत. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close