S M L

ठाण्यात पालिका उपायुक्तांना फेरीवाल्यांची जबर मारहाण

ठाणे महानगर पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना गावदेवी परिसरात शंभर ते दीडशे फेरीवाल्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडलीये.

Sachin Salve | Updated On: May 10, 2017 09:52 PM IST

ठाण्यात पालिका उपायुक्तांना फेरीवाल्यांची जबर मारहाण

10 मे : ठाणे महानगर पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना गावदेवी परिसरात शंभर ते दीडशे फेरीवाल्यांनी जबर मारहाण केल्याची घटना घडलीये.

फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना फेरीवाले आणि  संदीप माळवी यांच्यात वाद झाला. या वादावादीनंतर शंभर ते दीडशे फेरीवाल्यांनी माळवी यांना घेराव घातला आणि जबर मारहाण केली. या मारहाणीत माळवी यांच्या नाकातोंडून रक्त आलं. त्यांच्या अंगावरचे कपडेही फाडण्यात आले. या प्रकरणी  नौपाडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. तसंच नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माळवी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 09:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close