S M L

गोरक्षकांवर कारवाई करा, मांस-विक्रेत्यांना शस्त्र परवाने द्या; हायकोर्टात याचिका

गोरक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2017 10:42 PM IST

गोरक्षकांवर कारवाई करा, मांस-विक्रेत्यांना शस्त्र परवाने द्या; हायकोर्टात याचिका

विवेक कुलकर्णी, मुंबई

17 जुलै :  तथाकथित गोरक्षकांवर कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरलंय. त्यामुळे गोरक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आलीये. तसंच मांसाचा व्यापार करणाऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्याची मागणीही करण्यात आलीये.

कथित गोरक्षकांविरोधात जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. गोरक्षकांकडून सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या हल्यांविरोधात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते शादाब पटेल यांनी ही याचिका दाखल केली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात आणि सर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. देशभरात गोमांसाच्या मुद्यावरुन २४ जणांची हत्या करण्यात आली असल्याचंही या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. आगामी बकरी ईदच्या निमित्ताने या हल्ल्यांमध्ये वाढ होण्याची भीती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

तसंच कायदेशीररित्या मांसाचा व्यापार करणाऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close