S M L

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी सेनेच्या सुनील सितपला अटक

सुनील सितपला आज विक्रोळी कोर्टात हजर केलं जाणार आहे

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2017 10:00 AM IST

घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी सेनेच्या सुनील सितपला अटक

25 जुलै : घाटकोपरमधल्या सिद्धी साई  इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा नेता सुनील सितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी रात्री उशिरा सितपला अटकही करण्यात आली आहे. सुनील सितपला आज विक्रोळी कोर्टात  हजर केलं जाणार आहे.

घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळ  सिद्धी साई अपार्टमेंटची इमारत सकाळी कोसळली. या दुर्घटनेत आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय.  सिद्धी साई इमारत दुर्घटनेला शिवसेनेचा स्थानिक नेता जबाबदार असल्याचा आरोप दुर्घटनेतून बचावलेल्या रहिवाशानं केलाय. सुनील सितपचे हे नर्सिंग होम आहे. हे नर्सिंग होम तोडून सुनील सितप इमारतीच्या तळमजल्यावर हॉटेल सुरू करणार होता. सितपने हॉटेलसाठी नुतनीकरण करताना इमारतीचे बिम तोडल्याचा आरोप केलाय. सितपच्या बायकोने शिवसेनेच्या तिकीटावर महापालिकेची निवडणूक लढवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 10:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close