S M L

तोट्यातील 35 महामंडळं बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय

'मॅफ्को' महामंडळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून, डबघाईला आलेल्या महामंडळांच्या मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2017 10:11 PM IST

तोट्यातील 35 महामंडळं बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय

26 डिसेंबर : महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख ५५ महामंडळांपैकी जवळपास ३५ महामंडळे ही आर्थिकदृष्ट्या डळमळीत आली असून, ती टप्याटप्प्याने बंद करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

'मॅफ्को' महामंडळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून, डबघाईला आलेल्या महामंडळांच्या मालमत्तांची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

२०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅफ्को, मेल्ट्रॉन, कोकण विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ, भूविकास महामंडळ, महाराष्ट्र विकास महामंडळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

४ कोटींची उलाढाल असलेल्या भूविकास महामंडळाचा ५० कोटी रुपयांचा तोटा नोंदवण्यात आला होता. या महामंडळांची मालमत्ता विकून कर्ज फेडले जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 10:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close