S M L

मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक

उद्धव ठाकरे ही बैठक घेत आहेत. संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांचीही बैठक आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 4, 2017 12:54 PM IST

मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक

मुंबई, 04 सप्टेंबर: केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर नाराज शिवसेनेची महत्त्वाची बैठक मातोश्रीवर होतेय. उद्धव ठाकरे ही बैठक घेत आहेत. संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांचीही बैठक आहे.

रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये 4 कॅबिनेटच्या तर 9 राज्यमंत्र्याचा समावेश करण्यात आला. यामध्ये शिवसेनेला एकही मंत्रिपद मिळालं नाही. यावर रविवारी शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीकाही केली होती. त्यानंतर आता संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

संजय राऊत, रामदास कदम, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर आदी वरिष्ठ नेते या बैठकीस उपस्थित आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close