S M L

डोंबिवलीत शिवसेनेची पोलिसांविरोधात निदर्शनं

पोलीस ठाण्यांच्या उद्घाटनात सेना नेत्यांची नावं डावलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली

Sachin Salve | Updated On: May 1, 2017 10:46 PM IST

डोंबिवलीत शिवसेनेची पोलिसांविरोधात निदर्शनं

प्रदीप भणगे, डोंबिवली

01 मे : पोलीस ठाण्यांच्या उद्घाटनात सेना नेत्यांची नावं डावलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली.

डोंबिवलीतील विष्णुनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांचं आज(सोमवारी) नव्या इमारतींमध्ये स्थलांतर करण्यात आलं. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या नव्या इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत शिवसेनेच्या नेत्यांची नावं टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे शिष्टाचाराचा भंग झाल्याचा आरोप करत शिवसेनेनं पोलिसांविरोधात निदर्शनं केली. पोलीस राजकारण करत असून त्यांच्यावर भाजपाचा दबाव असल्याचा थेट आरोप यावेळी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2017 10:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close