S M L

...तर भाजपला संपवलं असतं - संजय राऊत

आम्ही निर्णयाच्या जवळ नक्कीच आहोत, पण तो आता जाहीर करणार नाही. हे सरकार ५ वर्षं चालावं, अशी जनतेचीही भावना आहे, काही कमिटमेंट्स असतात, असं सूचक विधान संजय राऊतांनी केलं. ते IBNलोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात बोलत होते.

Sonali Deshpande | Updated On: Oct 6, 2017 07:13 PM IST

...तर भाजपला संपवलं असतं - संजय राऊत

मुंबई, 06 आॅक्टोबर : मनात आणलं असतं तर भाजपला सुरुवातीलाच संपवलं असतं, पण राजकारणात संयम लागतो. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, हे सांगायला काही शिवसेना तयार नाही. आम्ही निर्णयाच्या जवळ नक्कीच आहोत, पण तो आता जाहीर करणार नाही. हे सरकार ५ वर्षं चालावं, अशी जनतेचीही भावना आहे, काही कमिटमेंट्स असतात, असं सूचक विधान संजय राऊतांनी केलं. ते IBNलोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात बोलत होते.

सरकारमध्ये राहून विरोध करू नये, असं कुणी सांगितलं.आम्ही विरोध करतच राहणार, असंही ते म्हणाले. मनसेचा मोर्चा फार विराट होता, असं मला वाटत नाही, असंही त्यांचं मत पडलं.मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांना विचारलं असता, ते अतिशय चांगल्या स्वभावाचे आणि प्रामाणिक नेते आहेत, असं राऊत म्हणाले.

पहा पूर्ण न्यूजरूम चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close