S M L

...म्हणून संजय दत्तला लवकर सोडलं, राज्य सरकारची कोर्टात माहिती

"संजय दत्तला शिक्षेत कोणतीही खास सवलत दिलेली नाही, संजय दत्तनं त्याला सांगण्यात आलेली कामं योग्यरित्या पूर्ण केली"

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2017 03:46 PM IST

...म्हणून संजय दत्तला लवकर सोडलं, राज्य सरकारची कोर्टात माहिती

17 जुलै : संजय दत्तला शिक्षेत कोणतीही खास सवलत दिलेली नाही, संजय दत्तनं त्याला सांगण्यात आलेली कामं योग्यरित्या पूर्ण केली, म्हणून त्याला लवकर सोडण्यात आलं अशी माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात  दिली. तसंच सर्व नियमांची पूर्तता करूनच जेल प्रशासनानं हा निर्णय घेतला असंही राज्य सरकारने स्पष्ट केलं.

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तने येरवडा तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आला. पण संजय दत्तला आठ महिने लवकर सोडण्यात आलं आणि त्याला सतत देण्यात आलेले पॅरोल याला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. कोर्टाने राज्य सरकारकडून संजय दत्तच्या सुटकेबद्दल खुलासा मागितला होता. संजय दत्त जेलमध्ये असताना अर्धावेळ तर पॅरोलवर बाहेर होता मग त्याची वर्तणूक चांगली होती हे कसं काय कळालं असा सवालही कोर्टाने विचारला होता.

आज कोर्टात राज्य सरकारने आपला खुलासा सादर केला. संजय दत्तची जेलमध्ये वर्तवणूक चांगली होती आणि त्याला सांगण्यात आलेली कामं योग्यरित्या पूर्ण केली. त्याला कोणतीही विशेष सवलत देण्यात आली नाही अशी माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिली.

मात्र, याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी यावर आक्षेप घेतलाय. त्यामुळे २ आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close