S M L

खारघर रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी

नवी मुंबईत दोन रिक्षाचालक संघटनामध्ये तुंबळ हाणामारी झालीये. या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झालेत

Sachin Salve | Updated On: Nov 21, 2017 06:58 PM IST

खारघर रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी

21 नोव्हेंबर : "आमच्या भागात रिक्षा का चालवली" या वादातून नवी मुंबईत दोन रिक्षाचालक संघटनामध्ये तुंबळ हाणामारी झालीये. या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झालेत.

नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्टेशनबाहेर तळोजा आणि खारघऱ आॅटो रिक्षाचालकांमध्ये ऐन संध्याकाळी तुफान हाणामारी पाहण्यास मिळाली. तळोजामधून येणाऱ्या रिक्षाचालकांनी खारघरमध्ये प्रवासी नेऊ नये. त्यामुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम होतोय असा खारघरच्या रिक्षाचालकांचा आक्षेप होता. त्यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातील रिक्षाचालकांनी एकमेकांवर तुफान हल्ला केला. हा वाद सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण या धुमश्चक्रीत पोलीसही जखमी झाले. या हाणामारीत 4 रिक्षाचालक जखमी झाले आहे. तर एक पोलीस काॅन्सटेबल जखमी झालाय. दोन्ही गटाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 06:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close