S M L

राणे करणार नव्या पक्षाची घोषणा; पक्षाचं नाव स्वाभिमान आणि चिन्ह वज्रमुठ

या पक्षाचं नाव स्वाभिमान असेल तर पक्षाचं चिन्ह वज्रमुठ असणार आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 1, 2017 09:57 AM IST

राणे करणार नव्या पक्षाची घोषणा; पक्षाचं नाव स्वाभिमान आणि चिन्ह वज्रमुठ

मुंबई, 01 ऑक्टोबर: काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे आज आपल्या नव्या राजकीय वाटचालीची घोषणा करणार. नारायण राणे आज नव्या पक्षाची मुहुर्तमेढ रोवणार आहे.

आज मुंबईतील यशंवतराव चव्हाण सेंटर इथे   नव्या पक्षाची राणे स्थापना करणार आहेत.  या पक्षाचं नाव स्वाभिमान असेल तर पक्षाचं चिन्ह वज्रमुठ असणार आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी, राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावरही टीका केली. घटस्थापनेच्या दिवशी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर राणे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर चर्चेला उधाण आलं होतं.  या चर्चेला आज  पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close