S M L

 जनतेची दिशाभूल केल्याबद्दल सरकारने माफी मागावी- राधाकृष्ण विखे पाटील

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिरावीचे शेतकरी शांताराम कटके यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात जुलै २०१४ मध्ये शेततळ्यासाठी १ लाख ७९ हजार रूपये मंजूर झाले . त्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाला व पावसाळ्यात शेततळ्याची उभारणी शक्य नसल्यानं त्याचं काम काही महिन्यानंतर पूर्ण झालं.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 4, 2017 06:33 PM IST

 जनतेची दिशाभूल केल्याबद्दल सरकारने माफी मागावी- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, ४ नोव्हेंबर, २०१७: शेततळे योजनेच्या 'मी लाभार्थी’ असे घोषवाक्य देऊन राज्य सरकारने दिलेल्या जाहिरातीमधील माहिती चुकीची असून त्यामुळे जनतेची दिशाभूल होते आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. या दिशाभूलीसाठी सरकारने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या शेततळ्यासाठी मी लाभार्थी’ असे घोषवाक्य देऊन जाहिरातीतील शेततळ्यांसाठी काँग्रेस आघाडी सरकारने जुलै २०१४ मध्येच निधी दिला होता. तसंच संबंधित शेतकऱ्याने कर्ज काढून शेततळ्याचा बाकी खर्च पूर्ण केला होता. तरीही हे शेततळे आपल्यामुळेच झाल्याची जाहिरात करून भाजप-शिवसेना सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे अशी माहिती पाटील यांनी केली.

शेततळ्याच्या या जाहिरातीमागील वास्तव समोर आल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त विखे पाटीलांनी आपल्या भावन्या व्यक्त केल्या. ते म्हणाले तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारने सुरू केलेल्या जाहिराती फसव्या, वस्तुस्थितीशी विसंगत आणि अतिशयोक्ती करणाऱ्या आहेत.

पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील भिरावीचे शेतकरी शांताराम कटके यांना काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात जुलै २०१४ मध्ये शेततळ्यासाठी १ लाख ७९ हजार रूपये मंजूर झाले . त्यानंतर लगेच पावसाळा सुरू झाला व पावसाळ्यात शेततळ्याची उभारणी शक्य नसल्यानं त्याचं काम काही महिन्यानंतर पूर्ण झालं.

शेततळ्यासाठी लागलेली एकूण रक्कम मंजूर निधीपेक्षा किती तरी अधिक होती. त्यामुळे शांताराम कटके यांनी कर्जही घेतलं होतं. कटके यांनी अत्यंत परिश्रमानं उभारलेल्या शेततळ्याची खोटी जाहिरात करून त्याचे संपूर्ण श्रेय लाटण्याचाअश्लाघ्य प्रकार राज्य सरकारने केलाय. त्यामुळे यासाठी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 06:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close