S M L

पुनतांब्याच्या शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

या बैठकीत सरकारच्या कर्जमाफीने नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची खंत शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:03 PM IST

पुनतांब्याच्या शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

26 जून : पुनतांब्याचे शेतकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या कर्जमाफीने नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची खंत शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. तसंच ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे ते माफ करावे आणि वीज बिल देखील माफ करावं अशी मागणीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी केली. मात्र, ही कर्जमाफी पुरेशी नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसंच पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनीही कर्जमाफीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आज या शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली.

या बैठकीत, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान 50 हजार रुपये किंवा 50 टक्के मदत मिळावी असं गाऱ्हाणं पुनतांब्यातील शेतकऱ्यांनी शरद पवारांकडे मांडलं.

तसंच जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्यांना 50 टक्के कर्ज माफ करावे, ती मर्यादा दीड लाख पर्यंत असावी अशी मागणीही पवारांकडे केली. तसंच शेतीसाठी जो वीज पुरवठा केला जातो तो फक्त वर्षाचे 100 दिवस असतो. वीज बील मात्र 365 दिवसांचं घेतलं जातं त्या संदर्भात बैठकीत चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close