S M L

कैदी मंजुळा शेट्टीच्या मृत्यूला इंद्राणी मुखर्जीची चिथावणी जबाबदार

इंद्राणी मुखर्जीनं चिथावणी दिल्यानंच ही मारहाण झाल्याचं उघड झाल्यानं तिच्यासह २०० महिलांवर गुन्हा नोंद झालाय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 26, 2017 03:09 PM IST

कैदी मंजुळा शेट्टीच्या मृत्यूला इंद्राणी मुखर्जीची चिथावणी जबाबदार

26 जून : भायखळा जेलमध्ये मारहाणी दरम्यान मृत्यू पावलेल्या कैदी मंजुळा शेट्टीचा मृत्यू हा मारहाणीमुळेच झाल्याचं उघड झालंय. शवविच्छेदनात तिला बेदम मारहाण झाल्याचं उघड झालंय.तसंच इंद्राणी मुखर्जीनं चिथावणी दिल्यानंच ही मारहाण झाल्याचं उघड झाल्यानं तिच्यासह २०० महिलांवर गुन्हा नोंद झालाय.

शनिवारी एका महिला पोलिसाशी झालेल्या किरकोळ वादातून तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर तिची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी 6 जणांचं निलंबन करून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close