S M L

सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांचं स्वाईन फ्लूनं निधन

ते वरळी ट्रॅफिक विभागात कार्यरत होते. ७ जुलै पासून ते वांद्रे येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण त्यांची प्रकृती सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांचे काल निधन झालं.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 10:54 AM IST

सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे यांचं स्वाईन फ्लूनं निधन

12 जुलै : मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप शिंदे, यांचे स्वाईन फ्लू आजाराने काल संध्याकाळी निधन झालंय. ते वरळी ट्रॅफिक विभागात कार्यरत होते. ७ जुलै पासून ते वांद्रे येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. पण त्यांची प्रकृती सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांचे काल निधन झालं.

पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं स्वाईन फ्लू आजाराने निधन झाल्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. विशेष करून ट्रॅफिक पोलिसांचा ज्यांना दिवसभर उन्हा-पावसात ट्रॅफिक व्यवस्था पहावी लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close