S M L

पोलिसांचा गुंडाराज, लग्नघरात घुसून नवरदेवाच्या आई-वडिलांना केली बेदम मारहाण

हळदीच्या कार्यक्रमात उशिरापर्यंत सुरू ठेवला म्हणून पोलिसांनी लग्नघरात घुसून केली मारहाण

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 01:05 PM IST

पोलिसांचा गुंडाराज, लग्नघरात घुसून नवरदेवाच्या आई-वडिलांना केली बेदम मारहाण

20 एप्रिल : दोन दिवसांपूर्वी पनवेल मधल्या तरूणाला भररस्त्यात बेदम मारहाणीचा प्रकार घडला होता. ते कमी होत की काय म्हणून, नवी मुंबईत पुन्हा पोलिसांची गुंडगीरी समोर आली आहे.

हळदीच्या कार्यक्रमासाठी रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पिकर चालू ठेवल्याने आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याचा राग ठेवत पोलिसांनी लग्नघरात घुसून मारहाण केली आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे गावातील कुंदन म्हात्रे यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असताना तीन वाजेपर्यंत डीजे सुरु होता. मात्र, पोलिसांनी डीजेचं सामान जप्त न करता, कोणालाही ताब्यात न घेता, थेट नवरदेव कुंदनच्या घरात घुसून त्याच्या आई, वडिल, भाऊसह 5 जणांना बेदम मारहाण केली आहे.

20 पोलीस जवानांच्या ताफ्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी ही मारहाण केलीय. या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या नवरदेवाच्या आई-वडिलांसह पाचही जणांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांच्या मारहाणी नंतर आता ग्रामस्थांमध्ये संतापाची परिस्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close