S M L

भाजपा आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडतंय - उद्धव ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: May 31, 2017 10:49 AM IST

भाजपा आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडतंय - उद्धव ठाकरे

 31 मे : शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि रोजगार निर्मितीसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केले त्याचा आधार घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून  भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. कर्जमुक्ती व रोजगार देणे शक्य नाही असे सांगणे हे परखड असले तरी आपणच दिलेल्या वचनांचा मुडदा पाडण्यासारखे आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला फटकारलं आहे.

तसंच, राजकारणी कोणत्याही पक्षाचे असोत, सत्तेत आल्यावर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या कर्तव्यपूर्तीची सुबुद्धी ईश्वर सर्वच राजकारण्यांना देवो!, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसहीत सर्वच राजकारण्यांना आणि देशातील सर्व सरकारांना जबाबदारीची आठवणही करून दिली आहे.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी हे अजूनही फक्त आश्वासनच आहे. तसंचआम्ही विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करायचो, पण आता कर्जमाफी देणे शक्य नाही. शिवसेना-भाजपने मते मागण्यासाठी हे वचन जाहीर सभांतून व जाहीरनाम्यातून दिलेच होते, पण या दोन्ही वचनांचे आता राममंदिर झाले आहे,  अशी टीका उद्धव यांनी केली आहे. आश्वासने आणि वचने म्हणजे निवडणुका जिंकण्याचे जुमलेच झाले असतील तर जनतेचा निवडणुकांतील भाषणे आणि राजकारण्यांवरचा विश्वास उडून जाईल. मोदींचे सरकार ही या देशातील जनतेची शेवटची आशा आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्यातील सरकारवर जबाबदारी जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close