S M L

कारागृह अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर, महिला अधिकाऱ्याचं नीलम गोऱ्हेंना पत्र

एक तुरुंग महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी थेट अधिक्षिकेपासून तर कर्मचारी महिलांपर्यंत सगळ्यांचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 09:42 AM IST

कारागृह अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर, महिला अधिकाऱ्याचं नीलम गोऱ्हेंना पत्र

12 जुलै : कारागृहात कैद्यासोबत सुरू असलेले अत्याचाराचे एक एक धक्कादायक प्रकार समोर येत असतानाच आता कारागृहातील महिला अधिकाऱ्यांचं लैंगिक शोषण कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती देणार एक पत्रच तुरुंग महिला अधीक्षक असलेल्या एका महिलेने आपल्याला पाठवल्याचा दावा नीलम गोर्हे यांनी केलाय.

 

एक तुरुंग महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी थेट अधिक्षिकेपासून तर कर्मचारी महिलांपर्यंत सगळ्यांचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आलाय. तब्बल ६० महिलांचं शोषण या अधिकाऱ्याने केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय.

त्यामुळे या अत्यंत गंभीर प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी नीलम गोर्हे यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close