S M L

धुक्यामुळे मध्य रेल्वे 10-15 मिनिटं 'लेट'!

मुंबई जवळच्या परिसरातील थंडी वाढली आहे.त्यामुळे परिसरात धुकं पसरलं आहे. कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून धुकं पडलंय. आणि त्यामुळे लोकलचा वेग कमी झालाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 7, 2017 08:30 AM IST

धुक्यामुळे मध्य रेल्वे 10-15 मिनिटं 'लेट'!

मुंबई,07 डिसेंबर:  मध्य रेल्वेमुळे आज प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास होतोय.  मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते आहे.

मुंबई जवळच्या परिसरातील थंडी वाढली आहे.त्यामुळे परिसरात धुकं पसरलं आहे.  कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून धुकं पडलंय. आणि त्यामुळे लोकलचा वेग कमी झालाय. आज धुक्याचं कारण आहे, आणि ते खरंही आहे. पण अलीकडे, एक दिवसा आड मध्य रेल्वेचं काही ना काही रडगाणं सुरूच असतं.

कल्याण, डोंबिवली आणि दिवा परिसरात सकाळ पासून दाट धुके पसरले असून मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. डोंबिवली - दिवा हे अंतर मोठं असून या पट्ट्यात लोकल मंद गतीने धावते  आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close