S M L

ठाकुर्लीत के.एम.पटेल कॉलेजमध्ये मनविसेचं ठिय्या आंदोलन

Sachin Salve | Updated On: Jun 7, 2017 10:31 PM IST

ठाकुर्लीत के.एम.पटेल कॉलेजमध्ये मनविसेचं ठिय्या आंदोलन

07 जून : ठाकुर्ली येथील के.एम.पटेल महाविद्याल्यात मनविसे आणि विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं.

१३ वीतील विद्यार्थ्यांचे निकालपत्र मे महिन्याच्या अखेरीस दिले गेले नाहीत म्हणून येथील विद्यार्थी संतापले होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे या विद्यार्थ्यांनी सदर महाविद्यालयाकडून होत असलेल्या या प्रकारची माहिती दिली. महाविद्यालयातील व्यवस्थापनाने ९ तारखेला या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे आश्वासन मनविसे दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

ठाकुर्ली येथील के. एम. पटेल विद्यालयात १३ वी मधील १९४ विद्यार्थ्यांना निकालपत्र दिले नव्हते. विद्यार्थ्यांनी याबाबत मनविसेकडे तक्रार केल्यावर मनविसेचे डोंबिवली अध्यक्ष समीर पालांडे , प्रीतेश पाटील , अक्षय चौगले , प्रतिक देशपांडे , भावेश कळसकर,राजेश लिंगायत , वैभव राणे यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थीही सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 10:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close