S M L

कमला मिलच्या मालकासह हाॅटेलमालकाविरोधात लूक आऊट नोटीस

आगीत जळून खाक झालेल्या रेस्टो-पबच्या मालकांचे परदेशी गुंतवणूकदारांची संबंध असल्याची माहिती मिळतेय.

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2017 08:26 PM IST

कमला मिलच्या मालकासह हाॅटेलमालकाविरोधात लूक आऊट नोटीस

30 डिसेंबर : कमला मिलमधल्या आग दुर्घटनेप्रकरणी कमला मिलच्या मालकासह मोजोस आणि वन-अबव्ह रेस्टाॅरंटच्या मालकांवर एमआरटीपी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच  मालक फरार होऊ नये म्हणून लूक आऊट नोटीस काढण्यात आलीय.

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेलाय. याप्रकरणी मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केलीये. आज  अवैध बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं मोजोस आणि वन-अबव्ह रेस्टाॅरंटच्या मालकांवर एमआरटीपी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केलाय. आणि  मालक फरार होऊ नये म्हणून त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आलीय.

आगीत जळून खाक झालेल्या रेस्टो-पबच्या मालकांचे परदेशी गुंतवणूकदारांची संबंध असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे देश सोडण्याआधी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आलीय. याशिवाय निष्काळजीपणाचा कळस गाठणाऱ्या पबच्या मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 08:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close