S M L

केडीएमसीचे नवे आयुक्त आले, २७ दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर गेले !

वघ्या आठवडाभरापूर्वी केडीएमसीचे आयुक्त म्हणून रुजू झालेले पी.वेलारासू यांना शासनानं महिनाभराच्या सक्तीच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठवलंय.

Sachin Salve | Updated On: Jun 3, 2017 09:03 PM IST

केडीएमसीचे नवे आयुक्त आले, २७ दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर गेले !

प्रदीप भणगे, कल्याण

03 जून : अवघ्या आठवडाभरापूर्वी केडीएमसीचे आयुक्त म्हणून रुजू झालेले पी.वेलारासू यांना शासनानं महिनाभराच्या सक्तीच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठवलंय. त्यांच्याजागी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त एन.रामास्वामी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

यापूर्वी महापालिका आयुक्त ई. रविंद्रन यांची काही दिवसांपूर्वी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली होती. त्यांच्याजागी नियुक्ती झालेले परिमल सिंह यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता, तर नुकतेच आलेले आयुक्त पी. वेलारासू यांना शासनानं आजपासून मसुरी इथे होणाऱ्या सक्तीच्या प्रशिक्षणासाठी पाठवलंय.

शहराला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्यानं शहराचा विकास होणार कसा? असं प्रश्न यानंतर खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर यांनी विचारलाय. केडीएमसीत शिवसेनेची सत्ता असल्यानं असं दुजाभाव केला जात असल्याची चर्चा यानंतर कल्याणात रंगली असून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महापौरांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 09:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close