S M L

मंजुळावर तुरुंग अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले- इंद्राणी

आज इंद्राणी कोर्टात हजर राहिली होती. मंजुळाच्या खासगी भागात काठ्या घातल्याचा आरोप इंद्राणीनं केला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 03:21 PM IST

मंजुळावर तुरुंग अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केले- इंद्राणी

28 जून : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीनं अत्यंत गंभीर आरोप जेल प्रशासनावर केले आहेत. आज इंद्राणी कोर्टात हजर राहिली होती. मंजुळाच्या खासगी भागात काठ्या घातल्याचा आरोप इंद्राणीनं केला आहे.

शिवाय महिला कैद्यांना पुरुष अधिकाऱ्यांनीही मारहाण केल्याचा आरोपही केलाय. अधिकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोपही तिनं केला. दरम्यान या प्रकरणचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे.

काय म्हणाली इंद्राणी ?

" मी पाहिलं की मंजुळा शेट्येला तिच्या गळ्याला ओढणीनं आवळून ओढले जातं होतं. तिला मारहाण करण्यात आली. मला नंतर कळालं का तिला मारहाण करण्यात आली. तिच्या खासगी भागात काठ्या घालण्यात आल्या असं मला कळलं. आम्ही या सगळ्या प्रकराबद्दल विचारायला गेलो. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी कळलं की तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महिला कैद्यांचा उद्रेक झाला, त्यांनी आंदोलन केलं. त्याचवेळी जेलमधील लाईट बंद करण्यात आले होते, त्यावेळी जी मारहाण झाली त्यात पुरुष पोलीसही होते.

मला तिथल्या पोलिसांनी मारहाण केली. माझ्या हातावर आणि पायावर मारहाण केली. त्या तुम्ही पाहू शकता. मला तिथल्या जेल अधिकाऱ्यांनी हिंदीत धमक्या दिल्या की तू आय व्हिटनेस बनना चाहती है तो तेरा भी हाल वैसाही बना देंगे. असं म्हणत मला धमक्या दिल्या. "

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close