S M L

मुंबईत आकाशात सोडणाऱ्या कंदिलांवर बंदी कायम

आकाशात सोडले जाणाऱ्या आकाश कंदिलांवर मुंबई पोलिसांनी 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी घातलीये.

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2017 09:06 PM IST

मुंबईत आकाशात सोडणाऱ्या कंदिलांवर बंदी कायम

17 आॅक्टोबर : आकाशात सोडले जाणाऱ्या आकाश कंदिलांवर मुंबई पोलिसांनी 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी घातलीये.

दर वर्षी आकाश कंदिलांचे नवनवीन प्रकार बाजारात येत असतीत, गेल्या काही वर्षांपासून आकाशात उडणारे आकाश कंदील सोडण्यात येतात, त्यात दिवा लावलेला असतो. या आकाश कंदिलांमुळे काही अपघात होण्याची शक्यता असते, आग लागणं, रॉकेट सारख्या फटाके या आकाशकंदिलाला लागले तर त्यामुळेही दुर्घटना होऊ शकते, हे संभाव्य धोके ओळखून दर वर्षीप्रमाणे या वर्षीही या आकाशकंदिलांवर बंदी घातलीये.

हे आकाशात उडणारे आकाश कंदील तरुणाईचं खास आकर्षण असतं. पण 14 नोव्हेंबरपर्यंत आता हे आकाश कंदील उडवता येणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 09:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close