S M L

मुंबईत कर्जमाफी मिळवणारे शेतकरी हे मच्छीमार !

मुंबई बँकेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जवाटप केले आहे

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2017 09:41 PM IST

मुंबईत कर्जमाफी मिळवणारे शेतकरी हे मच्छीमार !

12 जुलै : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर मुंबईत शेतकरी आहेत का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण मुंबईचे कर्जमाफीसाठी पात्र ते शेतकरी मच्छीमार असल्याचं समोर येतंय.

मुंबई बँकेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जवाटप केले आहे. त्यांची छाननी सुरू असून सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाईल अशी माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.

मुंबई बँकेच्या स्थापना वेळीच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबईतील मच्छीमारांना शेतकऱ्याचा दर्जा दिला होता. त्यामुळेच आमच्या बँकेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही शेतीसाठी कर्ज वाटप केले आहे.

मात्र, सरकारचा मुंबईतील लाभधारकचे आकडे 891 असण्यासंदर्भात दरेकर यांनी साशंकता व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close