S M L

डाॅ. तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टानं बजावली नोटीस

पदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डॉक्टर तात्या लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय.

Samruddha Bhambure | Updated On: Mar 31, 2017 04:25 PM IST

डाॅ. तात्याराव लहानेंच्या अडचणीत वाढ, मुंबई हायकोर्टानं बजावली नोटीस

31 मार्च :   पदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डॉक्टर तात्याराव लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय. त्यामुळे आता डाॅ. लहाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तात्याराव लहाने, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता इतकीच त्यांची मर्यादित ओळख नाहीये. तर, मोतीबिंदूच्या विक्रमी संख्येने शस्रक्रीया केल्याने पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले विख्यात नेत्रशल्य विशारद अशी त्यांची गौरवपूर्ण ओळख. लहानेंबाबत काही वाद यापूर्वीही झालेत खरे पण आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरुन  जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळांना जेलबाहेर बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मदत केल्याबद्दल विशेष ईडी कोर्टाने यांना दोषी ठरवलं आणि लहानेंच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेलाय.

आता या प्रकरणात लहाने यांना काय शिक्षा करायची याचा फैसला मुंबई हायकर्टाला घ्यायचा आहे. त्यासाठी आता हायकोर्टानं लहाने यांना नोटीस बजावली आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ईडी कोर्टात या प्रकरणाची याचिका केल्याने भुजबळांना केलेल्या मदतीचा प्रकार उघड झाला होता. छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. तात्याराव लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

वैयक्तिक संबंधापोटी जेव्हा कर्तव्याला तिलांजली दिला जाते तेव्हा काय होतं याचं हे मोठं उदाहरण. अपेक्षा आहे यातून किमान इतरांनी तरी बोध घ्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close