S M L

डोंबिवलीत प्रवाशांचा उद्रेक, अर्धा तास रिक्षा अडवल्या

भाडे घेण्याच्या कारणावरून संतापलेल्या प्रवाशांनी केळकर रोडवर अर्धा तास वाहतूक अडवून ठेवली.

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2017 10:24 PM IST

डोंबिवलीत प्रवाशांचा उद्रेक, अर्धा तास रिक्षा अडवल्या

29 जून : डोंबिवलीमध्ये प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये चांगलाच वाद पेटला. भाडे घेण्याच्या कारणावरून संतापलेल्या प्रवाशांनी  केळकर रोडवर अर्धा तास वाहतूक अडवून ठेवली.

डोंबिवलीमध्ये चाकरमान्यांना घरापर्यंत जाण्यासाठी सर्वात मोठा पर्याय हा रिक्षा असतो. पण, मनमानी कारभार आणि रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवाशांना अनेकदा फटका बसतो. मात्र आज प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला. भाडे न घेण्याच्या कारणावरून प्रवाशी आणि रिक्षाचालकांमध्ये चांगला वाद चिघळला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तब्बल अर्धा तास रिक्षा अडवल्या. केळकर रोड प्रवाशी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी तब्बल अर्धा तास बंद केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close