S M L

अंधेरीतील उच्चभ्रु शाळेत ट्रस्टीकडून विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण

उच्चभ्रु मुलांसाठी असणाऱ्या या शाळेत मुलींवर लैंगिक शोषण केलं गेलंय. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या शाळेचा ट्रस्टी पॅट्रीक ब्रिलांट हा या मुलींचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप काही पालकांनी केलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2017 10:46 PM IST

अंधेरीतील उच्चभ्रु शाळेत ट्रस्टीकडून विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण

विवेक गुप्ता,मुंबई

05 जून : माणुसकीला काळीमा फासणारी घटना मुंबईतल्या अंधेरी इथल्या  प्रसिद्ध इंटरनॅशनल शाळेत घडली आहे. या शाळेचा ट्रस्टीच शाळेतल्या विद्यार्थ्यांच लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

मुंबईत असणाऱ्या एका प्रसिद्ध इंटरनॅशनल शाळेचं भयाण वास्तव समोर आलंय. उच्चभ्रु मुलांसाठी असणाऱ्या या शाळेत मुलींवर लैंगिक शोषण केलं गेलंय. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या शाळेचा ट्रस्टी पॅट्रीक ब्रिलांट हा या मुलींचं लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप काही पालकांनी केलाय. इथंच हे भयाण वास्तव थांबत नाहीतर या शाळेती एक शिक्षिका लंच ब्रेकमध्ये या निरागस मुलांना विकृत पॅट्रीकच्या कॅबीनमध्ये नेत होती असा आरोप झालाय.

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागण्यापूर्वी या निरागस मुलांचं त्यानं लैंगिक शोषण केलं. मात्र त्यानंतर त्या मुलांना त्रास सुरू झाल्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून ही चक्रावून सोडणारी बाब समोर आली.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल केलाय. मात्र पॅट्रीक हा जर्मन नागरिक या आहे. या संपूर्ण घटनेविषयी शाळेची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला मात्र कॅमेरासमोर ते पळताना दिसले. शाळा प्रशासनाकडून कोणीच बोलण्यास तयार नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 10:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close