S M L

पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

"सुमार कामगिरी असलेल्या भाजपच्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी शक्यता आहे"

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 07:21 PM IST

पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, काही मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

20 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

10 महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. पुढच्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोअर कमिटीसह मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 'वर्षा'वर बैठक पार पडली.

या बैठकीला भाजपचे काही राज्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलावर चर्चा झाली. तसंच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचंही ठरलं. त्यामुळे सुमार कामगिरी असलेल्या भाजपच्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

त्यामुळे कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळतो आणि कुणाला बढती मिळते याकडे सगळ्याचं लक्ष्य लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 07:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close