S M L

विधानसभाध्यक्ष म्हटले खाली बसा !,अन् विरोधक चक्क खाली बसले

विधानसभाध्यक्षांनी विरोधकांना खाली बसायला सांगितल्यावर विरोधक चक्क खाली बसले.

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2017 08:20 PM IST

विधानसभाध्यक्ष म्हटले खाली बसा !,अन् विरोधक चक्क खाली बसले

02 आॅगस्ट : सभागृहात गदारोळ होणं ही काही नवी गोष्ट नाही मात्र आज विधानसभेत वेगळच घडलं. विधानसभाध्यक्षांनी विरोधकांना खाली बसायला सांगितल्यावर विरोधक चक्क खाली बसले.

घडलेली हकीकत अशी की, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक घोषणाबाजी करत होते. त्यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांना खाली बसण्यास सांगितलं.. सभापतींनी खाली बसण्याचा आदेश दिल्यावर विरोधकांनी त्याचा सोयिस्कर अर्थ काढला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य वेलमध्ये येवून बसले.

तुम्हीच खाली बसा असं सांगितलं म्हणून आम्ही बसलो असं खाली बसलेले सदस्य अध्यक्षांना म्हणाले. तेव्हा अध्यक्षांना काय बोलावं तेच सुचत नव्हतं. खाली बसा याचा अर्थ बाकावर जावून बसा असा आदेश अध्यक्षांनी दिला आणि पुढच्या कामकाजाला सुरुवात केली. .मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं नंतर 12 मिनीटांसाठी कामकाज तहकूब केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 08:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close