S M L

31 आॅक्टोबरपर्यंत गरजू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार - मुख्यमंत्री

'जे खरे शेतकरी आहेत त्यांच्याशी कर्जमाफीसंदर्भात चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांशी चर्चा करणार नाही,' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 6, 2017 03:45 PM IST

31 आॅक्टोबरपर्यंत गरजू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार - मुख्यमंत्री

06 जून : 31 आॅक्टोबरपर्यंत गरजू शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफी कोणाला द्यायची यासाठी चार महिने अभ्यास करणार, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी त्यांनी शिवसेनेचा उल्लेख न करता शिवसेनेवर टीका केली. ' कोणत्याही पक्षावर बोलणार नाही, राज्यातली जनता सर्व बघत आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

'जे खरे शेतकरी आहेत त्यांच्याशी कर्जमाफीसंदर्भात चर्चा करणार, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांशी चर्चा करणार नाही,' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र बंदच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, ' केवळ 3 बाजार समित्यांनी काल बंद पाळला,  300 समित्या कार्यरत होत्या.कालची आंदोलनं राजकीय पक्षाकडून झाली.' आंदोलन करणाऱ्यांची यादी हातात असल्याचं ते म्हणाले.

कर्जमाफी देण्यासाठी आंध्र प्रदेश माॅडेलचा अभ्यास करणार असल्याचं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close