S M L

छगन भुजबळ अखेर जेलबाहेर येणार !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी भुजबळ यांना परवानगी देण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2017 05:53 PM IST

छगन भुजबळ अखेर जेलबाहेर येणार !

03 जुलै : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अखेर जेल बाहेर येणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी भुजबळ यांना परवानगी देण्यात आलीये.

छगन भुजबळ गेल्या दीड वर्षांपासून आर्थर रोड जेलमध्ये आहे. अनेक वेळा त्यांनी जामिनासाठी अर्ज केला पण प्रत्येकवेळी अर्ज फेटाळल्यामुळे भुजबळांचा बाहेर येणाच्या मार्ग बंद राहिला. येऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता.

ईडीनं मात्र पीएमएलए कोर्टाला यावर निकाल देण्याचा अधिकार नसल्याचा म्हणत परवानगीस विरोध केला होता.

पण बिहारमधील खासदार पप्पू यादव आणि शहाबुद्दीन यांनी जेलमध्ये अशा निवडणुकांमध्ये मतदान केल्याचे दाखले भुजबळांच्या वतीनं देण्यात आले.

अखेर पीएमपीएलए कोर्टाने आज छगन भुजबळ यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी परवानगी दिली आहे.

आता १७ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आणि आमदार म्हणून आता भुजबळ विधिमंडळात आपला मतदानाचा हक्क बजावतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close