S M L

चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू

शारदा घोडोस्वार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. शारदा घोडेस्वार आज सकाळी कामावर जात होत्या. त्या कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्या उभ्या असताना त्यांच्या अंगावर झाडं पडलं. हे झाडं पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याआधीही अशी घटना चेंबुरमध्ये घडली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 7, 2017 04:00 PM IST

चेंबूरमध्ये  अंगावर झाड  कोसळल्याने महिलेचा मृत्यू

चेंबुर,07 डिसेंबर: चेंबूरमध्ये आज एका महिलेच्या अंगावर झाड पडून तिचा मृत्यू  झाला आहे. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

शारदा  घोडोस्वार असं या मृत व्यक्तीचं नाव आहे.  शारदा घोडेस्वार आज सकाळी कामावर जात होत्या. त्या कामावर  जाण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्या उभ्या  असताना त्यांच्या अंगावर झाडं पडलं. हे  झाडं पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. याआधीही अशी घटना चेंबूरमध्ये घडली आहे. कांचन नाथ नावाची एक महिला मॉर्निंग वॉकला गेली असताना तिच्या डोक्यावर नारळ पडलं होतं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हवेमुळे नारळ पडल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं. आता त्याच परिसरात ही दुसरी घटना घडली आहे.

वाढत्या शहरीकरणासह जंगलतोडही वाढली  आहे. त्यातच मुंबई सारख्या शहरात अत्यंत कमी झाडं उरली  आहेत. त्यांची व्यवस्था नीट लावली गेली नाही तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहणार. त्यामुळे शासनाने काही ठोस पाऊलं  घेणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close