S M L

मुंबईत सिलेंडर स्फोटात 6 ठार 11 जखमी

बुधवारी रात्री उशिरा या इमारतीत हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर इमारतीत आग लागली

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 7, 2017 08:33 AM IST

मुंबईत सिलेंडर स्फोटात 6 ठार 11 जखमी

मुंबई,07 सप्टेंबर:मुंबईतील जुहू परिसरातल्या विकासाधीन इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला तर 11 लोकं जखमी झाले आहेत.

बुधवारी रात्री उशिरा या इमारतीत हा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर इमारतीत आग लागली.दरम्यान अग्निशामक दल लगेच घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवलं. या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये 9 पुरूष आणि दोन महिला आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.या स्फोटात मृत्यूमुखी पडलेले इमारतीचं बांधकामाचं  काम करणारे  मजूर असल्याचं सांगण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 08:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close