S M L

निसर्गाचा 'खेळ चाले', सिंधुदुर्गात पडला पिवळा पाऊस

डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडण्याची घटना घडली होती पण आता सिंधुदुर्गात पिवळा पाऊस पडल्याची अजब घटना घडलीये

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2017 10:03 PM IST

निसर्गाचा 'खेळ चाले', सिंधुदुर्गात पडला पिवळा पाऊस

06 एप्रिल : डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडण्याची घटना घडली होती पण आता सिंधुदुर्गात पिवळा पाऊस पडल्याची अजब घटना घडलीये.

सिंधुदुर्गातल्या माणगाव गावात गुरुवारी सकाळी (६एप्रिल) पिवळा पाऊस पडलाय. आज सकाळी इथल्या नागरिकाना आपल्या गाड्यांवर हे पिवळे थेंब पडताना दिसले.

हा पाऊस म्हणजे अॅसिड रेनचा प्रकार असल्याच अनेक जणांच मत आहे. पर्यावरण दृष्ट्या समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गात अशा प्रकारचा पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वाढत चाललेल प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात किती गंभीर स्वरुपाचे बदल होतायत याच हे उदाहरण मानलं जात आहे. हा असा पाऊस नक्की कोणत्या प्रकारचा आहे, याबाबत प्रशासनाने तज्ञांकडून तातडीने जाणून घेण्याची गरज असल्याचं मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 10:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close