S M L

वेगानं गाडी चालवणाऱ्या युवकाला महिलेनं घडवली अद्दल, घटना cctvमध्ये कैद

वेगाने गाडी चालवणं ही एक स्टाईलच झालीय, पण अशीच स्टाईल मारणाऱ्या एका युवकाला कोल्हापूरमधल्या एका रणरागिणीनं चांगलीच अद्दल घडवलीय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 13, 2018 07:33 PM IST

वेगानं गाडी चालवणाऱ्या युवकाला महिलेनं घडवली अद्दल, घटना cctvमध्ये कैद

कोल्हापूर, 13 मार्च : वेगाने गाडी चालवणं ही एक स्टाईलच झालीय, पण अशीच स्टाईल मारणाऱ्या एका युवकाला कोल्हापूरमधल्या एका रणरागिणीनं चांगलीच अद्दल घडवलीय.वेगवान गाडी चालवत महिलेला डॅश मारून पुढे गेलेल्या युवकाला या महिलेनं गाठलं आणि चांगलाच चोप दिलाय. आणि ही घटना cctv मध्ये कैद झालीय.

कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरात ही घटना घडलीय. या महिलेचा हा रुद्रावतार पाहून अनेक जण अचंबित झाले. यावेळी शेजारीच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तिथे धाव घेतली.  हे गंभीर प्रकरण असताही निव्वळ दंडाची पावती करून त्या युवकाला पोलिसांनी सोडून दिलं. सध्या कोल्हापूर शहरात या घटनेची चांगलीच चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close