S M L

#कोपर्डीचानिकाल : तिन्ही आरोपींना एकत्र शिक्षा भोगावी लागणार - उज्ज्वल निकम

मुख्य आरोपीला खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत असं नमूद करत कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलीये.

Sonali Deshpande | Updated On: Nov 29, 2017 01:18 PM IST

#कोपर्डीचानिकाल : तिन्ही आरोपींना एकत्र शिक्षा भोगावी लागणार - उज्ज्वल निकम

29 नोव्हेंबर : कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने  आज शिक्षा सुनावली.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला विनयभंग प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा बलात्कार प्रकरणी जन्मठेप आणि 20 हजारांचा दंड आणि खून, बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. तर सहआरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेला बलात्काराचा कट रचणे, मुख्य आरोपीला मदत करणे यासाठी जन्मठेप, 20 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तसंच  मुख्य आरोपीला खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा  सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत असं नमूद करत कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलीये.

निर्भयाला न्याय मिळण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांनी खटला लढवला. सुनावणीनंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close