S M L

चंद्रपुरात चक्क शौचालयांचीच चोरी

चंद्रपुरातल्या पाटण गावच्या गावकऱ्यांनी तब्बल 112 शौचालयं चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 4, 2017 12:02 PM IST

चंद्रपुरात चक्क शौचालयांचीच चोरी

चंद्रपूर, 04 सप्टेंबर: लोकांकडून सोनं चांदी चोरीला जातात पण पाटण गावात तर चक्क शौचालयंच चोरीला गेल्याचं कळतंय. चंद्रपुरातल्या पाटण गावच्या गावकऱ्यांनी तब्बल 112 शौचालयं चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

तर झालंय असं की या गावातल्या 110 घरांमध्ये शौचालयं बांधकामासाठी दोन वर्षांपासून खोदलेले खड्डे तसेच होते. यामुळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतीत जाऊन शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर या महिलांना तब्बल 110 घरांमध्ये शौचालयांसाठी अनुदान दिले असल्याची आणि शौचालयं बांधणी पूर्ण  झाली असल्याची नोंद असल्याचं सांगण्यात आलं. घरात शौचालय नसतानाही कागदावर नोंद असल्याने या महिलांना धक्काच बसला. गंमत म्हणजे शौचालयं नसतानाही या गावाने हागणदारीमुक्त सुंदर गावाचा पुरस्कारही पटकावला आहे.

ग्रामपंचायतीच्या कागदपत्रावर असलेल्या नोंदीनुसार या गावकऱ्यांना शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी पाच हजार शंभर रुपये देण्यात आल्यानंतर शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालंय. वस्तुस्थिती उघड झाल्यावर महिलांनी  पोलिसात तक्रार केली . त्यानंतर  प्रशासनाने आता चौकशीचे आदेश दिले आहेत.

सध्यातरी शौचालयं नसल्याने या महिलांना अजुनही बाहेरच शौचाला जाव लागतंय. तर कागदोपत्री शौचालयं असलेल्या या  गावाला हागणदारीमुक्त घोषीत करणाऱ्या आणि  बाकीचा गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close