S M L

'शोध अण्णाभाऊंच्या घराचा', पुण्यात उद्या ग्रंथ प्रकाशन सोहळा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'मृत्यूकडून जीवनाकडे' आणि 'शोध अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा उद्या पुण्यात पार पडणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2017 07:43 PM IST

'शोध अण्णाभाऊंच्या घराचा', पुण्यात उद्या ग्रंथ प्रकाशन सोहळा

25 जुलै : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'मृत्यूकडून जीवनाकडे' आणि 'शोध अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा उद्या पुण्यात पार पडणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक संशोधक धर्मपाल कांबळे यांनी अणाभाऊंच्या 'मृत्यूकडून जीवनाकडे' या पुस्तकांचं संकलन केलंय. या पुस्तकांचा पुणे पत्रकार भवनात उद्या बुधवारी दुपारी 2 वाजता प्रकाशन सोहळा होणार आहेत. आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होतोय. तसंच धर्मपाल कांबळे यांच्या 'शोध अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा' या पुस्तकाचंही प्रकाशन होणार आहे.

या सोहळ्याला माहिती वृत्त मंत्रालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष संकेत देशपांडे आहेत. कर्तव्य फाऊंडेशन आणि प्रेरणा प्रकाशनकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 06:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close