S M L

....आणि तपोवन एक्स्प्रेस चार डबे सोडून पुढे गेली

नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यानंतर गाडी 4 डबे मागे सोडून पुढे निघून गेली

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 08:51 PM IST

....आणि तपोवन एक्स्प्रेस चार डबे सोडून पुढे गेली

11 एप्रिल : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यानंतर गाडी 4 डबे मागे सोडून पुढे निघून गेल्याची घटना मनमाडच्या रेल्वे बंधाऱ्या जवळ घडली.

नांदेडहुन मुंबईकडे निघालेली तपोवन एक्स्प्रेस दुपारी 4 च्या सुमारास मनमाडजवळ पोहोचली. मनमाड बंधाऱ्याजवळ एक्स्प्रेस पोहोचल्यानंतर अचानकपणे कपलिंग तुटले. त्यामुळे रेल्वे 4 डब्बे मागे सोडून पुढे निघून गेली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र हा प्रकार गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने ड्रायव्हरशी संपर्क साधल्यामुळे गाडी मागे आणली आणि राहिलेले डबे पुन्हा जोडण्यात आले. त्यानंतर एक्स्प्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 08:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close