S M L

वाघोबा शिकारीला कंटाळले अन् मजुराचा डबा घेऊन गेले !

हे मजूर आपल्यासोबत आणलेला डबा एका ठिकाणी ठेऊन दुसऱ्या ठिकाणी कामाला जातात

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2017 07:02 PM IST

वाघोबा शिकारीला कंटाळले अन् मजुराचा डबा घेऊन गेले !

07 डिसेंबर : वाघोबा म्हटलं तर जंगलचा राजा...शिकार करणे,शिकारीचा पाठलाग करणे हा वाघाचा धर्मच म्हणावा...पण याच वाघोबांना चक्क शिकारीचा कंटाळा आला की काय ?, अशी दृश्य ताडोबातल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालीयेत.

त्याचं झालं असं की, ताडोबात काम करणाऱ्या मजुरांनी घरून आणलेला डबाच चक्क वाघोबांनी पळवल्याचा प्रकार समोर आलाय.

ताडोबा अभयारण्यात अनेक मजूर काम करतात. हे मजूर आपल्यासोबत आणलेला डबा एका ठिकाणी ठेऊन दुसऱ्या ठिकाणी कामाला जातात. डब्याजवळ कोणी नाही हे पाहून एक वाघ त्या ठिकाणी आला त्यानं आजुबाजूला पाहिलं आणि एक डबा घेऊन निघून गेला. आता या डब्यात काय जेवण होतं आणि वाघानं त्या डब्याचं काय केलं हे मात्र आम्हाला माहिती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close