S M L

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सरकार भरणार

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2017 08:25 PM IST

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज सरकार भरणार

23 आॅगस्ट :  कर्जमाफीसाठीच्या पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारने आणखी एक दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या 31 जुलै 2017 पर्यंत कर्जावरील व्याज राज्य सरकार भरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीबद्दल आणखी एका निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 च्या कालावधीत घेतलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची 30 जून 2016 पर्यंत थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंत मुद्दल आणि व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीस पात्र करण्यात आली आहे.

अशी रक्कम दीड लाखाच्या वर असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे असं स्पष्ट करण्यात आलंय.

तसंच 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 पर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जापैकी 30 जून 2016 पूर्वी किंवा नंतर झालेल्या पुनर्गठित-फेरपुनर्गठित कर्जाचे 31 जुलै 2017 पर्यंत व्याजासह थकित आणि उर्वरित हप्ते दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत असल्यास त्याचा योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मात्र, अशी रक्कम दीड लाखाच्या वर असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी दीड लाखावरील थकित पीक कर्ज, पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जाची थकित उर्वरित रक्कम 31 डिसेंबर 2017 पर्यंत भरणे आवश्यक आहे अशी सुचनाही देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 08:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close