S M L

रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का?,संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल

अशावेळी आता सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का या गाण्याच्या धरतीवर आता एसटी कर्मचाऱ्यांनी ही एक गाण तयार केलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 19, 2017 08:02 PM IST

रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का?,संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल

19 ऑक्टोबर: गेले तीन दिवस राज्यभरातला एसटीचा प्रश्न चिघळला आहे.  अनेक गाड्या या आगारातच उभ्या आहे. अशावेळी आता सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का या गाण्याच्या धरतीवर  आता एसटी कर्मचाऱ्यांनी ही एक गाण तयार केलंय.

या गाण्यात परिवहनमंत्र्यांना कर्मचारी प्रश्न करत आहेत. रावते कर्मचाऱ्यांना गोल-गोल फिरवतात. तसंच प्रवाशांना दैवत म्हटलंय त्यांची दैना तुला कशी चालेल हा प्रश्नही विचारला गेला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी तोकड्या पगारात तुकडा कसा खायचा असा प्रश्नही विचारला गेलाय.तर एसटीला हायफाय करण्यावर  टीकाही  करण्यात आली आहे.

एकंदरच एसटी कर्मचाऱ्यांचा नाराजीचा सूर या गाण्यातून स्पष्ट दिसतो आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रश्न कधी सुटतो हे पहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 07:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close