S M L

सत्तेत राहूनही आंदोलन करणाऱ्या शिवसेनेनं स्वतःचं हसं करून घेतलंय- चंद्रकांत पाटील

ते पुढे म्हणाले, ' रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने स्वतःचे हसू करून घेतले आहे. घरातील भांडणं रस्त्यावर काढण्याची वृत्ती चुकीची आहे.'

Sonali Deshpande | Updated On: Sep 27, 2017 01:11 PM IST

सत्तेत राहूनही आंदोलन करणाऱ्या शिवसेनेनं स्वतःचं हसं करून घेतलंय- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, 27 सप्टेंबर : शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही,  सत्तेत राहून कुणालाही डबल रोल करता येत नाही, भाजप नेते आणि महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.  कोल्हापूरमध्ये ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ' रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने स्वतःचे हसू करून घेतले आहे.  घरातील भांडणं रस्त्यावर काढण्याची वृत्ती चुकीची आहे.'

ते असंही म्हणाले, शिवसेनेच्या खात्याबद्दल भाजप कधीच बोलत नाही. सुभाष देसाईंच्या पाठीशी मुख्यमंत्री ठाम राहिलेत.  शिवसेना सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेत स्वतःचे नुकसान करून घेत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं मुंबई,ठाण्यात भाजपविरोधी आंदोलनं केली होती. पंतप्रधान मोदींवरही शिवसेननं टीका केली होती. त्यावेळी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. यावरच चंद्रकांत पाटीलांनी हे वक्तव्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close