S M L

दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आज पुन्हा सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Jun 15, 2017 12:47 PM IST

दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आज पुन्हा सुरू

15 जून : जवळपास दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. नवीन वह्यापुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले आहेत. तर शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून अनेक शाळांत स्वतः मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

अन्य बोर्डांच्या शाळा आधीपासूनच सुरू झाल्या असल्या, तरी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा गुरुवारपासून सुरू होत आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. पहिल्या दिवशीच्या घंटेसाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सध्या राज्यभरात एकूण एक लाख तीन हजार 685 शाळा आहेत. त्यापैकी 67 हजार 717 शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, 21 हजार 261 अनुदानित तर, 13 हजार 988 विनाअनुदानित शाळा आहेत. यापैकी विदर्भ वगळता सर्व शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. विदर्भात 26 जूनला शाळा सुरू होतील.

शाळेचा पहिला दिवस खास असतो तो पहिल्यांदा शाळेत प्रेवश करणाऱ्या चिमुकल्याणसाठी, हिच बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड मधील एका शाळेन आपल्या विद्यार्थ्यांच चक्क सनई चौघडा वादनाने स्वागत केलं आहे. शाळेचा पहिला दिवस ,पावसाची रिमझीम आणि त्यात सनई-चौघड्याचे मंगलमय सुर, या वातरणात विद्यार्थिहि हारखुन गेले होते. पहिल्याच दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पिंपरि चिंचवड मधील ज्ञानप्रबोधनी शाळेन केलेल्या या अनोख्या स्वागतच पालकांनीही कौतुक केलं आहे. चेंबूरच्या नावाजलेल्या लोकमान्य टिळक शाळेत असंच प्रसन्न वातावरण होतं. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सुशोभित करण्यात आल्या होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2017 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close